Monday, June 8, 2020

Lockdown मधील नाती

*नात्याला गच्च मिठी मारलीच पाहिजे🌹*


*नातं कोणतंही असो*
*मतभेद कितीही असो* 
*संबध तोडण्याची भाषा*  
*मुळीच कधी करू नये* 

*प्रत्येक माणूस वेगळा* 
*विचारसरणी वेगळी*
*मनुष्य जन्मा तुझी* 
*कहाणीच आगळी-वेगळी* 

*बापा सारखा मुलगा नसतो* 
*मुला सारखी सून नसते*
*नवरा आणि बायकोचे तरी*
*कुठे तेवढे पटत असते ?*

*जरी नाही पटले तरी*
*गाडी मात्र हाकायची असते*
*अबोला धरून विभक्त होऊन*
*सार गणितं चुकायचे नसते*

*काही धरायचं असतं*
*काही सोडायचं असतं*
*एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून* 
*एकमेकाला सोडायचं नसतं* 

*चुकल्यावर बोलावं*
*बोलल्यावर ऐकून  घ्यावं*
*एकांतात बसल्यावर*
*अंतरंगात डोकवावं*

*राग मनात ठेवला म्हणून*
*कोणाचं भलं झालं का ?*
*बिन फुलाच्या झाडा जवळ*
*पाखरूं कधी आलं का ?*

*समोरची व्यक्ती चुकली तरी* 
*प्रेम करता आलं पाहिजे* 
*झालं गेलं विसरून जाऊन* 
*गच्च मिठी मारली पाहिजे* 

*स्वागत होईल न होईल*
*जाणं येणं चालू ठेवल पाहिजे* 
*समोरचा जरी चुकला तरी* 
*म्हणा "खुशाल ठेव देवा त्याला !"*

*आयुष्य खूप छोटं आहे* 
*हां हां म्हणता संपुन जाईल*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून*
*शेवटी खूप पश्चात्ताप होईल* 

*लक्षात ठेवा नात्या पेक्षा*
*दुसरं काहीही मोठं नाही*
*आपलं माणूस आपल्या जवळ*  
*या सारखी श्रीमंती नाही !*

*➖सर्व आप्तस्वकीयांना, नातलगांना आणि मित्र मैत्रीणीना समर्पित*

15 comments:

Lockdown मधील नाती

*नात्याला गच्च मिठी मारलीच पाहिजे🌹* *नातं कोणतंही असो* *मतभेद कितीही असो*  *संबध तोडण्याची भाषा*   *मुळीच कधी करू नये*  *प्रत्येक माणूस वेग...